भारतीय सेवा क्षेत्रामध्ये 'नील अर्थव्यवस्थेचे' योगदान : एक विवेचन
Overview & Synopsis
भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवाक्षेत्र हे एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात याचे मोठे योगदान आहे. या सेवा क्षेत्रामध्ये विमा कंपन्या , बँका,वित्त, पर्यटन, आरोग्य शिक्षण ,दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. सेवा क्षेत्र याची महत्त्वपूर्ण भूमिका भारतीय अर्थव्यवस्थेत दिसून येते. रोजगार निर्मिती,नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे नवीन उत्पादने तयार करणे,इतर उद्योगांना सेवा पुरवून त्यांचा विकास करण्याचे काम या क्षेत्रातून सातत्याने होताना दिसत आहे. परंतु आज देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे , गरिबी, यामुळे सेवा क्षेत्रामधून देशातील रोजगार अन्न सुरक्षितता इ. पूर्ण होतीलच असे होत नाही. सेवा क्षेत्रातील संसाधने वाढली नाही तर देशाचा आर्थिक विकास कसा साधला जाईल, यासाठी अर्थतज्ञ हे वेळोवेळी नवीन क्षेत्रांचा समावेश असावा असे सांगतात. यामध्ये अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्र (शेती, पशुसंवर्धन, वनीकरण) द्वितीय क्षेत्र (उद्योग क्षेत्र, उत्पादन, बांधकाम इत्यादी) याबरोबरच प्रत्यक्ष क्षेत्र म्हणून सेवा क्षेत्राचा विचार केला जातो. आज आजमितीला या क्षेत्रांवर अर्थव्यवस्थेमध्ये चतुर्थ क्षेत्र (संशोधन व कौशल्याधारित ज्ञान)पंचकक्षेत्र (प्रशासन,प्रशिक्षण धोरणे ठरविणे.)इ.समाविष्ट आहेत. तंत्रज्ञानाद्वारे इतरही क्षेत्र रूपांतरित होत आहे. यामध्ये ग्रीन अर्थव्यवस्था , एक डिजिटल अर्थव्यवस्था, अंतरिक्ष अर्थव्यवस्था इत्यादी अर्थव्यवस्था या विकसित होऊ लागले आहेत. अशाच प्रकारच्या अर्थव्यवस्था या निर्माण होत आहेत त्यामुळे सर्वच क्षेत्रांचा विकास होणे गरजेचे आहे ,यामध्ये समुद्रक्षेत्रात मानव पूर्वीपासून अवलंबलेला आहे ,सागरी संसाधनाचा उपयोग करत आहे ,परंतु आज लोकसंख्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात भार पडताना दिसतो. त्याबरोबरच वैश्विकदृष्ट्या सर्व देश एकमेकां जवळ येत आहे. जगातील बरेच देश हे सागरी किनाऱ्यावर वसलेले आहेत . त्यांना सागरी संसाधनांचा देखील फायदा होत आहे. काही देशांच्या आजूबाजूला जरी फक्त जमीन असती तरी त्यांना सागरी मार्गानेच व्यापार करावा लागत आहे. उदा. उझबेकिस्तान,अफगाणिस्तान, कझाकीस्तान. या संशोधन पेपर मध्ये भारतीय सेवा क्षेत्रात ब्ल्यू इकॉनोमी /नील अर्थव्यवस्थेचे योगदान, तसेच या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेले उद्योग मत्स्यपालन, समुद्री पर्यटन इत्यादींचा सेवाक्षेत्र समावेश होऊन त्याचा फायदा विकसित व विकसनशील देशांना होऊन त्यांचा विकास साधला जात आहे. याविषयी अभ्यास केला आहे.
zenodo.org)
← / → for pages • + / - for zoom • 0 to fit width
Powered by Mozilla PDF.js v3.11
Document Information
| Document Title | भारतीय सेवा क्षेत्रामध्ये 'नील अर्थव्यवस्थेचे' योगदान : एक विवेचन |
|---|---|
| Author / Organization | प्रा. डॉ. कैलास जाधव, घोडके वैशाली महेंद्र |
| Subject & Discipline | Scientific Research & Data |
| Categories | Science & Mathematics |
| Publication Year | 2025 |
| License / Rights | cc-by-4.0 |
| Resource Verification | Listed PDF (Verification Pending) |
| Original Host Website |
Zenodo
(zenodo.org)
|
| File Format | application/pdf (Portable Document Format) |
| Reported File Size | 1405.7 KB (1,439,395 bytes) |
| Language | EN |
| Catalog ID | DOC-97503 |
| Original Source Link | Visit Source Page on zenodo.org » |