भारतातील शाश्वत शेतीचे स्वरूप- सदा हरितक्रांती
Overview & Synopsis
गोषवारा आर्थिक विकासाच्या संदर्भात शाश्वतता ही एक गतिमान संकल्पना म्हणून विचारात घेतली जाते सातत्यपूर्ण रीतीने प्रयत्न सुरू ठेवणे रास न होऊ देता टिकून राहण्यास सक्षम असणे हा शाश्वतेचा मूळ अर्थ आहे जमीन व तिचा सुपीक थर ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे कारण त्यावरच वनस्पती कीटक प्राणी व मानव यांचे अस्तित्व अवलंबून आहे या देणगीचा वापर शेतीमध्ये केला जातो व शेती विकास हा आपल्या एकूण विकास प्रयत्नाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे म्हणूनच आपली शेती करण्याची पद्धत ही शाश्वत शेतीची असायला हवी वर्तमान पिढीची अन्नधान्याची गरज व इतर गरजा पूर्ण करताना त्यातील आधारभूत अशा निसर्गदत्त जमिनीच्या व पर्यावरणाच्या गुणवत्तेचा ऱ्हास न होऊ देणे तसेच जमिनीशी निगडित जीवन चक्र अबाधित ठेवून हे नैसर्गिक साधन भावी पिढ्यांसाठी जतन करणे याची जाणीव ठेवणारी शेतीची पद्धत म्हणजे शाश्वत शेती होय कृषीसाठी वापरण्यात येणाऱ्या नैसर्गिक साधनसामग्रीचे यशस्वी पद्धतीने असे व्यवस्थापन करणे की ज्यामुळे बदलत्या मानवी गरजा भागवल्या जातील व त्याचवेळी पर्यावरणाचा दर्जा राखून किंवा त्यात वाढ करून नैसर्गिक साधनसामग्रीचे जतन केले जाईल शाश्वत कृषी व संकल्पनेमध्ये ग्रामीण विकासाचा नवीन दृष्टिकोन अपेक्षित आहे या संकल्पनेमध्ये परस्पराशी संबंधित महत्त्वाचे पैलू विचारात घेतले जातात ज्या व्यवस्थेमध्ये उत्पादनातील बदल हा नेहमी धनात्मक असतो तिला शाश्वत व्यवस्था असे म्हणतात शाश्वत्थ विकासामध्ये अशा प्रकारे नैसर्गिक साधनसामग्री वापरली जाते की जिचे पुनर्वीकरण करता येते साधनसामग्री वापरण्याची पद्धत अशी असते की ज्यामध्ये तिचा नाश होत नाही किंवा दर्जा कमी होत नाही किंवा पुढील पिढीपर्यंत त्या साधनसामग्रीची उपयुक्तता टिकून राहते सतत वाढत असलेल्या लोकसंख्येला अन्नधान्य व इतर उत्पादनाची गरज पडणार असून ती वाढती राहील शाश्वत शेतीमध्ये ही गरज पूर्ण व्हायला हवी लोकसंख्येची वाढ सीमित करणे किंवा अन्नाच्या पर्यायी स्त्रोतांचा वापर करणे हे वेगळ्या संदर्भातील पण पूरक उपाय आपल्याला शाश्वत शेतीमध्ये अपेक्षित आहे.
zenodo.org)
← / → for pages • + / - for zoom • 0 to fit width
Powered by Mozilla PDF.js v3.11
Document Information
| Document Title | भारतातील शाश्वत शेतीचे स्वरूप- सदा हरितक्रांती |
|---|---|
| Author / Organization | Prof. R. V. Bhole, कांबळे, महादेव बाबुराव |
| Subject & Discipline | Scientific Research & Data |
| Categories | Science & Mathematics |
| Publication Year | 2025 |
| License / Rights | cc-by-4.0 |
| Resource Verification | Listed PDF (Verification Pending) |
| Original Host Website |
Zenodo
(zenodo.org)
|
| File Format | application/pdf (Portable Document Format) |
| Reported File Size | 701.3 KB (718,146 bytes) |
| Language | EN |
| Catalog ID | DOC-115173 |
| Original Source Link | Visit Source Page on zenodo.org » |